🔥 Trending News

Back to Trending
EVENTS

शीतला माता सेवा समितीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

📅 06 Mar 2026

👁 44 people read this

चंद्रपूर : शहरातील शीतला माता मंदिर सेवा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरी करण्यात आली. शिवगर्जना, देशभक्तीपर घोषणांनी आणि उत्साही वातावरणाने परिसर दुमदुमून गेला होता.
या निमित्ताने शीतला माता मंदिर सेवा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्य संकल्पना आणि आदर्शांवर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. पसायदान ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश काका गुंडावार यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक अभिषेक डोईफोडे तसेच सेवानिवृत्त प्राचार्य मा. त्र्यंबक गुल्हाणे सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन शीतला माता सेवा समितीचे अध्यक्ष अविनाश पुट्टेवार, उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी, उपाध्यक्ष रामकिशोर बिल्लोरे तसेच शीतला माता मंदिर सेवा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.
कार्यक्रमास केशव मेश्राम, श्रावण नन्नावरे, चंद्रभान चिंचाळकर, अनिल चवरे, लक्ष्मीकांत कैंकर्यंवार, पत्रुजी रागीट, रमेश कासूलकर, विजय गादेवार, दीपक तम्मीवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त प्राचार्य विजय कोंकमवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शीतला माता सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

← Back to Trending