NEWS
बांधकाम कामगार भांडी योजना | Bandhkam Kamagar Bhandi Yojana
📅 10 Feb 2026
👁 160 people read this
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विविध कल्याणकारी योजना राबवत असते. यामध्ये त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि मूलभूत गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या जातात. अशाच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार भांडी योजना आहे. या योजनेंतर्गत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी आवश्यक असलेल्या स्वयंपाकाच्या भांड्यांचा संच मोफत दिला जातो.
जर आपण बांधकाम कामगार असाल आणि या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छित असाल, तर खालील माहितीच्या आधारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आपण लाभ मिळवू शकता. शासनाने सुरु केलेली ही योजना गरजू बांधकाम कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा हि विनंती.
बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचे उद्दिष्ट:
- बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करणे.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगारांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांची मदत करून त्यांचा भार हलका करणे.
- गरजू आणि गरीब कामगारांना मोफत भांडी संच उपलब्ध करून देणे.
इमारत बांधकाम कामगार भांडी योजनेची वैशिष्ट्ये:
- महाराष्ट्र शासनातर्फे मोफत भांडी वाटप: पात्र कामगारांना गृहपोयोगी भांडी दिली जातात.
- सोपी अर्ज प्रक्रिया: कामगारांना योजनेचा लाभ सहजपणे मिळावा अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे यासाठी किमान कागदपत्रांची आवश्यकता ठेवण्यात आली आहे.
- संपूर्ण राज्यभर राबविली जाणारी योजना: ही योजना राज्यभरातील बांधकाम क्षेत्रातील पात्र कामगारांना लागू आहे.
- घरगुती उपयोगी भांड्यांचा समावेश: तांब्या, पितळी भांडी, स्टीलचे ताट, वाट्या, डबे आदी भांड्यांचा यात समावेश आहे.
- सामाजिक व आर्थिक विकास: या योजनेमुळे कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा होते आणि त्यांचा आर्थिक बोजा हलका होतो.
बांधकाम कामगार भांडी योजनेचे लाभार्थी कामगार ही योजना केवळ बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोंदणीकृत कामगारांसाठी आहे.
बांधकाम कामगार भांडी योजनेअंतर्गत दिली जाणारी भांडी:या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खालील स्वयंपाक भांडी संच मोफत दिले जाते.
- स्टीलची भांडी – ५ लिटर
- पाण्याचा जग (2 लीटर)
- प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील)
- तवा (लोखंडी किंवा नॉन-स्टिक)
- कढई (स्टील)
- पाण्याचे ग्लास
- पातेले झाकणासह
- मोठा चमचा (भात वाटपाकरीता)
- तांब्या-पितळेचे पाणी पिण्याचे भांडे
- ताट, वाटी आणि चमचे – प्रत्येकी ४ संच
- मोठा चमचा (वरण वाटपाकरीता)
- कप-बशी संच
- परात
- मसाला डब्बा (7 भाग)
- डब्बा झाकणासह (14 इंच)
- डब्बा झाकणासह (16 इंच)
- डब्बा झाकणासह (18 इंच)
- स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह
- भाजी चिरण्यासाठी चाकू आणि खराटे (झारी)
- डबे आणि पातेली संच
- गॅस लाइटर आणि चमचे सेट
बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी आवश्यक पात्रता व अटी:योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा बांधकाम क्षेत्रात किमान ९० दिवस कार्यरत असावा.
- अर्जदाराची संबंधित बांधकाम कामगार मंडळात सक्रिय नोंदणी असावी व त्याचा नोंदणी क्रमांक असावा.
- अर्जदाराने राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या इतर कोणत्याही योजनेंतर्गत भांड्यांचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार राज्य सरकारच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा सदस्य असावा.
बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भांडी वाटप योजनेची अर्ज करण्याची अंतिम तारीख त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर स्पष्टपणे नमूद केलेली नाही. अर्जाची अंतिम तारीख वेळोवेळी बदलू शकते किंवा ती विशेष अधिसूचनेद्वारे जाहीर केली जाऊ शकते.तसेच आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालयात, तालुका कामगार सुविधा केंद्रात किंवा मंडळाच्या विभागीय कार्यालयात संपर्क साधून अर्जाची अंतिम तारीख आणि इतर आवश्यक माहिती मिळवू शकता.
बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- कामगार नोंदणी प्रमाणपत्र
- अर्जदाराचे बँक खाते तपशील
- नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो
- कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला)
- स्वयंघोषणापत्र (योजनेचा पूर्वलाभ घेतलेला नसल्याचे प्रमाण)
बांधकाम कामगार भांडी योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे:
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास
- अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास
- अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे न दिल्यास
- अर्जदार पात्र नसताना देखील अर्ज केल्यास
- अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज सादर केल्यास
- अर्जदाराच्या नावावर पूर्वीच या योजनेचा लाभ घेतल्याची नोंद असल्यास
बांधकाम कामगार भांडी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येईल.
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरता येतो.
- अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज सादर केल्यानंतर त्याची छाननी केली जाईल आणि पात्र कामगारांना भांडी संच वितरित केला जाईल.
- ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:
- कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात किंवा ग्रामपंचायत/महानगरपालिका कार्यालयात अर्ज उपलब्ध असतो. किंवा खाली अर्ज दिलेला आहे तो डाउनलोड करावा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज कार्यालयात जमा करावा.
- अर्ज तपासल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना भांडी संच दिला जातो.
अर्जाची अंतिम तारीख आणि इतर तपशीलांची अचूक माहिती मिळवण्यासाठी, कृपया मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
← Back to Trending