📅 27 Mar 2026
चंद्रपूर जिल्ह्यातील खडसंगी येथे श्री क्षेत्र हनुमान मंदिर देवस्थान व मंदिर जीर्णोद्धार समिती-2026 यांच्या वतीने प्रभू श्रीराम मूर्ती स्थापना व रामनवमी निमित्त भव्य महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक आणि भक्तिमय सोहळा दिनांक 26 मार्च 2026, गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. कीर्तीकुमार उर्फ बंटी भाऊ भांगडिया तसेच मा. सौ. अपर्णाताई कीर्तीकुमारजी भांगडिया उपस्थित राहिले असून त्यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी पार पडल्या आहेत. कार्यक्रमात गावातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आली.
रामनवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात अभिषेक, पूजन, हवन, आरती तसेच महाप्रसादाचे वितरण यांचा समावेश आहे. भक्तांसाठी हा कार्यक्रम श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची एक मोठी संधी ठरणार आहे.
तसेच दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह विशेष आरती व प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र हनुमान मंदिर देवस्थान, खडसंगी मंदिर जीर्णोद्धार समिती-2026 यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. धार्मिक एकात्मता, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम महत्त्वाचे ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.